पिंपरी,दि.१( punetoday9news):-
श्री सद्गुरू बाळुमामा बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम वाल्हेकरवाडी येथील श्री सद्गुरू बाळुमामा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड परिसरातील सामाजिक संस्था, संघटना, पोलीस स्टेशन, शिक्षण संस्था आदींना सुमारे तीन हजार रोपांचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी उपमहापौर व नगरसेवक सचिन चिंचवडे, भाजपचे शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे, कुमार प्रसाद, संस्थेचे अध्यक्ष बंडू मारकड पाटील, प्रा. डॉ. बाळासाहेब सोनवणे, काकासाहेब मारकड, सचिन कोपनर, प्रभाकर कोळेकर, अभिजित वायकुळे, अनिल कारंडे, समाधान मारकड, विठ्ठल कारडे, सतिश पाटील, बिरमल मारकड, सुरेश मारकड, दादासाहेब कोपनर, अशोक मारकड,बिभीषण घोडके, सचिन सलगर, नागनाथ वायकुळे, प्रसाद वायकुळे, नितीन कोपनर आदी उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदा वृक्षारोपण आणि तब्बल तीन हजार रोपांचे वाटप हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पोलीस ठाणे, शाळा, महाविद्यालये, सर्वसामान्य नागरिक यांना रोपांचे वाटप करण्यात आले. याबाबत संस्थेचे अध्यक्ष बंडू मारकड पाटील यांनी सांगितले, की वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व सर्वानाच पटले आहे. झाडे लावली तरच ऑक्सिजन मिळणार आहे. तर दुसरीकडे विकासकामे होत असताना याच विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात येतात. मात्र, त्या प्रमाणात झाडे लावली जात नाहीत. ही विषमता दूर होणे गरजेचे आहे. यामुळे पिंपरी चिंचवडमधील विविध संस्थांमध्ये वृक्षारोपण व रोपांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Comments are closed