दापोडी,दि.१( punetoday9news):- कोरोनाच्या संकटकाळात सर्व सामान्यांची परवड झाली.यात कष्टकरी, लघुउद्योजक, हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागली.यात भरडल्या गेलेल्या गरजू नागरिकांना दिलासा मिळावा या हेतूने ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या वतीने दापोडी येथील महात्मा फुले नगर येथे गरजूंना जिवनाश्यक साहित्याचे वाटप कैलास बनसोडे यांनी केले.

गेली पंधरा दिवसांपासून परिसरात दिलासा सप्ताह राबविण्यात येत आहे. याचबरोबर कोरोनाच्या संकटात प्राणवायूचे सर्वांना महत्त्व कळावे आहे. कोरानाने अनेकजणांनी स्वतच्या कुटुंबातील सदस्य जिवलग नातेवाईक गमावले आहेत.पर्यावरण अबाधित राखण्यासाठी याची समाज मनात जनजागृती व्हावी यासाठी पिंपळवृक्ष लावून कैलास बनसोडे यांनी या उपक्रमातून सामाजिक संदेश दिला आहे.
मी सावित्रीबाई फुले बोलतेय या एकपात्री नाटकाद्वारे संसर्ग जन्य आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी स्वत:ची व इतरांची काळजी घेण्याबाबत मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर पाळून कोरोना विरूद्धचे युद्ध जिंकले पाहीजे असा सामाजिक संदेश याद्वारे उषाताई कांबळे प्रबोधन व्याख्यात्या ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या वतीने परिसरात करण्यात येत आहे.

याबाबत ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास बनसोडे म्हणाले, झोपडपट्टीतील जिवनाच्या व्यथा व वेदना मी अनुभवलेल्या आहेत.मी मुळचा सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एका छोट्याशा गावचा गेली चाळीस वर्षांपूर्वी आई वडील उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधात पिंपरी-चिंचवड उद्योग नगरीत आले.प्रथम त्यांनी बांधकाम मजूर म्हणून काम करत कुटूंब सांभाळले.आम्हाला घडवले.त्यामुळे झोपडपट्टीतील व्यथा व वेदनांची मला जाणीव आहे.

या सामाजिक उपक्रमात ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून कैलास बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमिलाताई इनामदार, राजश्री पोटे, ज्युलियाताई शितलानी, नुतन सोनवणे, बाळासाहेब भोसले,अल्फ्रेड जोसेफ, लॉरेन्स जाधव, प्रदीप रॉय, राजेश हातेकर, रमेश सोलंकी आदी योगदान करत आहेत.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!