पिंपरी,दि. २( punetoday9news):- छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख तथा कोकण संपर्कप्रमुख रामभाऊ जाधव यांची छावा मराठी माथाडी व जनरल कामगार युनियन कोकण मुंबई प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती नियुक्ती 2023 पर्यंत असणार आहे. नियुक्तीचे पत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलास पांगारकर, किशोर चव्हाण, सचिव ऍड. मयूर पांगारकर यांनी नुकतेच प्रदान केले.
रामभाऊ जाधव यांची दहा वर्षांतील सामाजिक कामगिरी लक्षात घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न करीत आले आहेत. कामगार, रिक्षाचालक, अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम रामभाऊ जाधव यांनी केले आहे. लोकशाही मार्गाने कायद्याच्या माध्यमातून जनसेवा, चालक सेवा, जनहित, राज्य व राष्ट्रहित जोपासून लोकशाही दृढ निकोप संवर्धन व संघटनेच्या कार्यास गालबोट न लावता संघटनेचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने रामभाऊ जाधव यांना करण्यात आले.
आपल्या या पदाच्या माध्यमातून समाजातील प्रश्न सोडवून संघटनेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहोत. तसेच कामगारांच्या समस्या, अडीअडचणी आणि त्यांच्यावर होणारे अन्याय याला वाचा फोडण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून करणार असल्याचे रामभाऊ जाधव यांनी सांगितले.
Comments are closed