दिल्ली,दि.३( punetoday9news):- भावी शिक्षकांसाठी  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे . पुर्वी ७ वर्षे वैध असलेली शिक्षक पात्रता परीक्षा योग्यता प्रमाणपत्राची ( TET Certificate ) वैधता आता अमर्याद कालावधीसाठी वाढवण्यात आली आहे .

यामुळे शिक्षकी पेशा निवडण्याऱ्या इच्छुकांना फायदा होणार आहे . यापूर्वी या प्रमाणपत्राची वैधता ७ वर्षांसाठी होती . या कालावधीत शिक्षकाची नोकरी लागली नाही , तर इच्छुकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागत होती . त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा निर्णय बदलत प्रमाणपत्राची वैधता अमर्याद कालावधीसाठी वाढवली आहे . केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ही घोषणा केली आहे .

डी.एड, बी.एड करूनही उच्चशिक्षित युवकांचे बेरोजगारीचे प्रमाण मोठे आहे. महाराष्ट्रात तर बिगारी काम करणाऱ्या कामगाराएवढेही मानधन शिक्षकांना मिळत नसल्याने या क्षेत्रातील इच्छुक तरूणांना थोडासा दिलासा या निर्णयाने मिळेल.

 

Comments are closed

error: Content is protected !!