पिंपरी,दि.४( punetoday9news):- कोरोना महामारीत माळी समाजातील ज्या बालकांच्या आई-वडिलांचे छत्र हिरावल्या गेले अशा बालकांचे पालकत्व माळी महासंघ स्वीकारणार असून अशा बालकांचे शिक्षण,निवास व उदर पोषणाच्या खर्चासाठी आवश्यक ती मदत माळी महासंघ करणार असल्याचा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला.तसेच जी बालके एकविस वर्षावरील आहे त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी व शासनाच्या विविध योजनांचा लाभ अशा कुटुंबांना मिळवून देण्यासाठी माळी महासंघ प्रयत्नशील राहणार असल्याचे ठरविण्यात आले.
प्रदेश कार्यकारिणीच्या ऑनलाइन बैठकीच्या अध्यक्षस्थानी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे होते तर राष्ट्रीय सचिव रवींद्र अंबाडकर,कोषाध्यक्ष प्रा. नानासाहेब कांडलकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष काळूराम गायकवाड, प्रदेशाध्यक्ष अरुणराव तिखे, प्रदेश उपाध्यक्ष हिरामण भुजबळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अतुल क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम दिवंगत खासदार राजू सातव यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अरुणराव तिखे यांनी प्रास्ताविकात माळी महासंघाची भूमिका विशद केली आणि संघटनात्मक बाबींची चर्चा करून नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला संमती देण्यात आली.
या सभेत अविनाश ठाकरे, रवींद्र अंबाडकर, काळूराम गायकवाड, अरुणराव तिखे, प्रा. नानासाहेब कांडलकर, भारत माळी, कैलास महाजन, प्रदेश कोषाध्यक्ष श्रीकृष्ण गोरडे, प्रदेश उपाध्यक्ष एन.आय.काळे, हिरामण भुजबळ व प्राचार्य डॉ.नामदेवराव कोकोडे, संतोष जमदाडे, राजेश जावरकर, चंद्रकांत बोरकर, अतुल क्षिरसागर, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष सुयश श्रीखंडे यांनी माळी समाजाच्या उत्थानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या.तसेच माळी समाज हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा असतांनाही या समाजाला अपेक्षित राजकीय प्रतिनिधित्व नसल्याबद्दलची खंत व्यक्त करीत भविष्यात जनजागृती करण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला.

शासनाने ओबीसी प्रवर्गाची जनगणना करावी.
ओबीसी प्रवर्गाची जनगणना झाली नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या आरक्षणाचा टक्का खाली आणण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.त्यामुळे ओबीसी प्रवर्गाला योग्य न्याय मिळण्यासाठी राज्य शासनाने ओबीसी प्रवर्गाची जनगणना करावी असा ठराव माळी महासंघाच्या प्रदेश कार्यकरणी सभेत संमत करण्यात आला.

सामाजिक उत्थानासाठी एकसंघता महत्त्वाची-अविनाश ठाकरे
माळी समाजात सध्या अनेक समस्या आहेत.गरिबी व बेरोजगारीमुळे समाजाची अपेक्षित प्रगती झाली नाही.शेतीशी निगडित असणारा हा समाज व्यवसायभिमुख व्हावा यासाठी प्रयत्नांची गरज आहे.केजीफोसियाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवीला जात आहे.सहकार व राजकीय क्षेत्रात माळी समाजाने अपेक्षित झेप घेतली नाही. याकरिता समाजाची एकसंघता महत्त्वाची आहे असे मत माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी व्यक्त केले.माळी महासंघ त्यादृष्टीने वाटचाल करीत असून सामाजिक चेतना व सामाजिक अस्मिता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!