महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उपक्रम.

चिंचवड,दि.५(punetoday9news):- पर्यावरण दिना निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यानिमित्त दृष्टिहीन बांधवांच्या हस्ते चिंचवड परिसरात वृक्षरोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.


कोरोनाकाळात ऑक्सिजन ची कमतरता जाणविल्याने याची किंमत मानवाला मोजावी लागली आहे.या करिता वृक्ष लागवड हा भविष्यातील ऑक्सिजन
असल्याचे मत पत्रकार संघाचे अध्यक्ष पराग कुंकुलोळ यांनी व्यक्त केले. दृष्टिहीन बांधवांनी सीड बॉल पासून बनविलेल्या वृक्षाची लागवड करण्यात आली.
प्रसंगी पुणे विभाग अध्यक्ष नितीन शिंदे, मार्गदर्शक संजय माने, शिवप्रसाद डांगे,अतुल क्षीरसागर, जमीर सय्यद,शशिकांत जाधव, निलेश जंगम, औदुंबर पाडुळे, प्रसाद वाडगुले, सागर झगडे, सुरेश परब, मिलिंद संधान यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

 

पत्रकार संघाचे विजय जगदाळे, बेलाजी पात्रे, योगेश गाडगे, सुनील बेनके, प्रमोद सस्ते, संजय बेंडे, महादेव मासाळ, संदीप सोनार, संतोष महामुनी, रोहिदास धुमाळ, देवेंद्र सोनवणे, शहाजी लाखे, संतोष शिंदे, बलभीम भोसले, संतोष चव्हाण यांनी उपक्रमासाठी योगदान दिले.
पत्रकार संघाच्या वतीने संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांच्या कडे दोनशे सीड बॉल देण्यात आले. कोरोना काळात सामाजिक बंधीलकी जोपासत संघाच्या वतीने गरजू बांधवांना किराणा वस्तू व अत्यावश्यक साधनांचे वाटप केले. रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराच्या आयोजनातून सामाजिक बंधीलकी जोपासली.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!