पिंपळे निलख, दि. ५( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख मधील विशालनगर येथे वृक्षसंवर्धन करणाऱ्या पिंपळवन निसर्ग संवर्धन संस्थेने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून साजरा केला. पर्यावरण जनजागृती साठी प्रभात फेरी घेण्यात आली.
ह्या संस्थेच्या वतीने २०१७ पासून या संस्थेकडून वृक्ष संवर्धन केले जात आहे. परिसरात बाराशे हुन अधिक झाडे संस्थेतर्फे लावण्यात लावली असुन संवर्धन केले जात आहे. तसेच महानगरपालिकेने लावलेल्या जवळपास चौदाशे झाडांचे संगोपन संस्थेकडून केले जात आहे.
पर्यावरण दिननिमित्ताने राजेंद्र लुंकड यांच्या हस्ते वटवृक्ष लावून वृक्षारोपणला सुरुवात झाली.
परिसरातून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे झाडांना पाणी घालण्यासाठी नागरिकांकडून ३ पाण्याच्या टाक्या भेट स्वरूपात मिळाल्या आहेत तसेच वेळोवेळी वृक्ष निधी काढून संस्थेने वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम ४ वर्ष कायम ठेवला आहे
“पर्यावरण साठी व निसर्ग साठी सर्व नागरिकांनी या संस्थेत सहभागी होऊन एक तरी झाड दत्तक घ्यावे”
असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ववले याांनी केले आहे.
यावेळी डॉ संदीप लुनावात, नगरसेवक तुषार कामठे,नगरसेविका आरती चोंधे, संकेत चोंधे, दिलीप बालवडकर, योगेश मालखरे, विजय पाटुकले, अजय पाटुकले, राकेश गिरमे, संदीप बोडके, विनोद बोडके, दिपक चव्हाण, रोहित गायकवाड, आप्पा पोकळे, अरविंद पाटील, चंद्रकांत दरेकर, पुंडलिक दरेकर, सतीश वगरे, सुनील वगरे, कविता टकले, कानन चव्हाण, देवेंद्र बाजड, चेतन सूर्यवंशी,आदी सदस्य उपस्थित होते.
Comments are closed