खराडी, दि.( punetoday9news):- शिवराज्याभिषेक दिन ( ६ जून ) निमित्त दरवर्षी प्रमाणे संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने खराडी येथील कार्यालयात रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून, रक्तदानाला सुरवात करण्यात आली.
कोरोना व्हायरस’ च्या संकटामुळे पुणे शहर व जिल्ह्याची परिस्थिती अतिशय भयानक झाली आहे,कोरोनाच्या रुग्णांना रक्ताची गरज आहे.पुणे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा आहे, तो भरून काढण्यासाठी संभाजी ब्रिगेड च्या वतीने हातभार लावण्यात आला,
माणसानेच माणसाच्या कामी आले पाहिजे, व सर्वांनी सामाजिक कर्तव्य पार पाडले पाहिजे, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, प्रत्येकाने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे मत संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांनी वेक्त केले, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे यांच्या सह जिल्हा सरचिटणीस सनी थोपटे, दिपक गावडे, जिल्हा उपाध्यक्ष रणजित बिरादार, जिल्हा संघटक विठ्ठल सुर्यवंशी, जिल्हा संघटक हनुमंत गुरव, संघटक किशन झेंडे, व्यापारी आघाडी कार्याध्यक्ष गणेश कुंभार, संदीप शिंदे, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, मावळ संघटक संतोष सुर्यवंशी या संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकाऱ्यांनी व रक्तदात्यांनी रक्तदान केले
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी, जिल्हा सचिव निलेश ढगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मोहिनी रणदिवे, संध्या माने, कामगार आघाडी संघटक अंकुश हाके, मेजर बिरादार, व्यापारी आघाडी अध्यक्ष विवेक कावरे, उद्योजक अमोल हुलगे, अक्षय घुले, मधुकर गावडे,आदी उपस्थित होते.
Comments are closed