जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केले पाचशे वृक्षांचे रोपण.

चऱ्होली,दि.६( punetoday9news):- नगरसेविका विनया तापकीर आणि आदिती फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष रोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चऱ्होली, ताजनेमळा, मोरयानगर या भागात 500 विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.

चऱ्होली, ताजनेमळा, मोरयानगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी-चिंचवडच्या सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या हस्ते करण्यात आले नगरसेविका विनया तापकीर, अदिती फौंडेशन चे अध्यक्ष अजय गायकवाड, मेघा गायकवाड, व ताजनेमळा येथील नागरिक उपस्थित होते. प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

यावेळी नगरसेविका विनया तापकीर म्हणाल्या
दरवर्षी 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धना विषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे. पर्यावरण जतन करण्याची संस्कृती नागरिकांमध्ये रुजावी यासाठी दरवर्षी वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो असेही नगरसेविका तापकीर म्हणाल्या.

चिंच, मोह आणि रूहितक यांसारख्या पाचशे वृक्षांचे रोपण करण्यात आले.

Comments are closed

error: Content is protected !!