पुणे दि.7( punetoday9news):- पुणे जिल्ह्यात 7 जूनअखेर जुन महिन्यात ६३ मिलीमीटर एवढा पाऊस झाला असून साधारणतः १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरच म्हणजे जमिनीतील पुरेसा उपलब्ध ओलाव्यांचा विचार करुन वापसा परीस्थिती प्राप्त झाल्यानंतरच बियाणे पेरणी करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ८४हजार २७८ हेक्टर आहे. मागील वर्षी (सन २०२०-२१ मध्ये) २लाख १४हजार ९७२ हेक्टर क्षेत्रावर भात, बाजरी, मका, मुग, उडीद, सोयाबीन व भुईमुग या मुख्य पिकांची पेरणी झाली होती. पुणे जिल्ह्यात सोयाबीन व मका क्षेत्रात वाढ होत आहे. सन २०२१-२२ मध्ये २ लाख १९ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर मुख्य पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले असून एकूण बियाणे मागणी २८हजार ०८६ क्विंटल आहे.
महाबीज व खाजगी वितरकांकडुन एकूण २८हजार ०८६ क्विंटल बियाणे मागणी पैकी २२हजार ७२१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात तृणधान्य पिकांमध्ये भात हे प्रमुख पिकासाठी १२हजार ६८८ क्विंटल बियाणे मागणी असून तुलनेत १३हजार ९३७ (११० टक्के) बियाणे पुरवठा झाला आहे. वेल्हा, मावळ, मुळशी, भोर, हवेली, जुन्नर, खेड, पुरंदर तालुक्यांत रोपवाटीका तयार करण्यास सुरवात झाली आहे.
तसेच नियोजित केलेल्या क्षेत्रासाठी एकूण २लाख १४हजार ८०० मे. टन खताची आवश्यकता असून जिल्ह्यामध्ये गतवर्षीचा शिल्लक साठा ८९हजार ७६३ मे.टन व चालू हंगामामध्ये पुरवठा झालेला खतसाठा ४९हजार २२१ मे. टन अशी आज अखेर एकूण १लाख ३८हजार ९८४ मे. टन (७६ टक्के) उपलब्ध झाले आहे.
केंद्र सरकारच्या २० मे २०२१ च्या अनुदानीत खताच्या अनुदानामध्ये झालेल्या वाढीच्या परीपत्रकानुसार निश्चित झालेल्या दरानेच खतांची विक्री करण्यासंबंधी जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांना सूचित केले आहे. कोणत्याही विक्रेत्याने जादा दराने विक्री केल्यास सदर विक्रेत्यावर परवाना अधिका-यामार्फत कारवाई करण्यात येईल. तसेच जर कोणी विक्रेता जादा दराने विक्री करताना आढळल्यास जिल्हास्तरावरील संनियंत्रण कक्षास कळविण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे (९४२२३८४३८४) यांनी केले. सनियंत्रन कक्षाचा दूरध्वनी क्र. ९४०४९६३९६४, ९४२१३६७०२०, ०२०-२५५३७७१८/२५५३८३१० असा असुन ई-मेल आयडी dsaopune@gmail.com, adozppune@gmail.com असा आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!