• पालखी सोहळ्या बाबत आज विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक.
• दिंडी प्रमुखांशी झालेल्या चर्चेचा अहवाल शासनाकडे पाठवणार.
पुणे दि.८ ( punetoday9news):- आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत पालखी सोहळ्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच तीनही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान विविध दिंडी प्रमुख यांनी त्यांचे म्हणणे मांडले, त्या सर्वांचे म्हणणे या समितीने ऐकून घेतले. या नंतर या समितीकडून एक अहवाल शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
Comments are closed