पिंपरी,दि.९( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील तापकीरनगर मधील साई मल्हार कॅालनी मध्ये अनेक वर्षापासून रस्त्याचे काम प्रलंबित आहे. ड्रेनेज लाईन च्या नूतनीकरणासाठी सदर संपूर्ण रस्ता खोदला होता त्यामुळे संपूर्ण रस्ता हा खड्डेमय झाला असुन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

सदरील रस्त्यावर संपूर्ण पाणी साचते व खड्डे कळून येत नाहीत अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर पाण्याचा निचरा पण होत नाही तसेच मच्छरांचे प्रमाण वाढते आहे. अगोदरच कोरोनाने थैमान घातले असताना  डेंग्यू, मलेरीया, हिवताप सारख्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे .  औषध फवारणीची गरज आहे.

सदर समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी नागरिकांच्या वतीने विवेक तापकीर (अध्यक्ष काळेवाडी रहाटणी केमिस्ट असोसिएशन) यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Comments are closed

error: Content is protected !!