सांगवी. दि.९( punetoday9news):- सांगवी येथील सेवा सहयोग फाउंडेशन तर्फे औंध जिल्हा रुग्णालयास दहा लिटर क्षमता वापर असलेले बारा ऑक्सिजन कॉंन्सट्रेटर भेट देण्यात आले.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा भंडलकर यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक नांदापुरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी बोलताना कृष्णा भंडलकर म्हणाले,कोरोना महामारिच्या काळात ऑक्सिजन तुटवडा व त्यामुळे अनेकांना जिव गमवावा लागला ही बाब लक्षात घेऊन रूग्णांना पर्यायी व्यवस्था व्हावी या हेतूने हे ऑक्सिजन कॉंन्सट्रेटर जिल्हा रुग्णालयास देण्यात आले आहेत.कृष्णा भंडलकर म्हणाले,जिल्हा रुग्णालयात पुणे जिल्हा व इतर भागातून रूग्ण मोठ्या संख्येने येथे उपचारासाठी येतात.गरजूंना याचा उपयोग होईल.यावेळी डॉ.अशोक नांदापुरकर, मुकूंद माने,मुरली पेडीशेट्टी आदी उपस्थित होते.
Comments are closed