मुंबई,दि.१०( punetoday9news):- सोलर व रुफ टॉप सोलर प्रकल्पाबाबत महावितरणची प्रगती संथ असल्याबाबत ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच याप्रकरणातील संबंधित
दोषी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महावितरणला दिले.
मंत्रालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत डॉ राऊत यांनी अधिक्षक अभियंत्याना सोलर व रुफ टॉप सोलर प्रकल्पाच्या प्रगतीबाबत धारेवर धरत येत्या 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
सोलर प्रकल्पासाठी जमिनी घेण्यात अडचणी असल्यास त्यासाठी संबंधित मुख्य अभियंता यांनी पुढाकार घ्यावा. सरकारी संस्था, विद्यापीठे व इतर संस्था यांच्या उपलब्ध जमिनीवर सोलर प्रकल्प उभारण्यासाठी संयुक्त प्रकल्प तयार करून नफा व मिळकत यांच्यात त्यांना वाटेकरी करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
सोलर वीज प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून मासिक आढावा घेण्यात यावा. हायब्रीड ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत पवन ऊर्जेसोबत सोलर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी पवन ऊर्जा प्रकल्पाच्या उपलब्ध जमिनीवर सोलर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी पवन ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ऊर्जामंत्री यांचे सल्लागार उत्तम झाल्टे व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
Comments are closed