पिंपरी,दि.१०( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम रूग्णलायाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एका ऑक्सिजन टँकरचा सेफ्टी वॉल लिकेज झाल्याने रूग्णालय परिसरात मोठ्याप्रमाणावर ऑक्सिजन गळती झाली होती .

मात्र सुदैवाने प्रशासन व अग्निशामक दलाने वेळेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याने , नाशिक दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली . ऑक्सिजन टँकमधून ऑक्सिजन गळती झाल्याची घटना बुधवार सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली . तातडीने उपाययोजना करत गळती थांबविण्यात आली असून घटनास्थळी महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील , अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , राजेंद्र वाबळे यांनी धाव घेतली होती . नागरिकांनी घाबरून जाण्याच कारण नाही असे सांगण्यात आले आहे.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!