जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याकडे केले सुपूर्द.
पुणे, दि. 10( punetoday9news):- राज्यासह पुणे जिल्हयात मागील काही आठवड्यापासून म्युकरमायकोसीसचे रुग्ण आढळून येत आहेत.यांच्यावर योग्य ते उपचार विविध ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे सुरु आहेत. पण म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शनची कमतरता भासत होती. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जेनेटीक लाईफ सायन्सेस प्रा.ली. वर्धा या कंपनीने 50 हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून दिले.
पुणे विभागासाठी कंपनीने आज पाच हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम, सहायक संचालक डॉ. संजय देशमुख यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जेनेरिक लाईफ सायन्सेस प्रा.ली. वर्धा या कंपनीचे संचालक डॉ. महेंद्र क्षिरसागर यांनी पाच हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन सुपूर्त केले. येत्या आठवडयात पुणे विभागसाठी आणखी दोन हजार ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. म्युकरमायकोसीसच्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन दिलासा देणारे ठरेल असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.
Comments are closed