सोयीपेक्षा पर्यावरणाचा करा विचार … प्लास्टीक पिशव्यांना द्या नकार.
पिंपरी , दि १०(punetoday9news):- जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैली रूजावी या हेतूने सांगवी विकास मंच तर्फे सांगवी परिसरातील सर्व औषध विक्रेत्यांना मोफत कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
प्लास्टीक पिशव्यांपासून होणारे धोके माहित असूनही बऱ्याचदा अनेक नागरिकांकडून प्लास्टीक पिशव्यांचा वापर होताना दिसतो , आपण प्रत्येक जण फक्त आपली तात्पुरती सोय पाहतो आणि प्लास्टीक पिशवीचा वापर केला जातो , मात्र म्हनूनच सोयीपेक्षा पर्यावरणाचा करा विचार … प्लास्टीक पिशव्यांना द्या नकार ‘ हे घोषवाक्यानुसार व्यावसायिकांना कागदी पिशव्यांचे वाटप करण्याचे ठरवून कागदी पिशव्या वाटण्यात आल्या. व्यावसायिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कागदी पिशव्या वापरण्याचे आश्वासन दिले तसेच शुभेच्छा दिल्या.
अशी माहिती सांगवी विकास मंचचे कार्याध्यक्ष ओंकार महेश भागवत यांनी दिली. पर्यावरण दिनाच्या केवळ शुभेच्छा संदेश देण्याऐवजी प्रत्येकाने आपले वर्तन , जीवनशैली पर्यावरणपूरक कशी होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत , असे आवाहन महेश भागवत यांनी केले.
Comments are closed