10 जून दृष्टिदान दिवस.
दृष्टिदान दिवसाची जगात नोंद नाही.
स्वित्झर्लड मधील जीनिव्हा शहरात असणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेशी व इतर राज्यातील तत्जाशी संपर्क साधला असता ,१०जून या दिवसाची जागतिक दृष्टिदान दिवस म्हणून कोठेही नोंद नसल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राची पार्श्वभूमी असणाऱ्या या दिवसाला जागतिक दिवस ही नोंद मिळणे आनंदाची बाब आहे.मात्र डॉ. भालचंद्र यांचा विसर महाराष्ट्राला पडावा ही खरी शिकांतिका आहे.त्यांच्या स्मृतीला उजाळा देणारा हा दिवस आहे.त्यांचे नेत्रदाना बाबत असलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी या दिवशी जनजागृती अभियान राबविणे महत्वाचे आहे.
पिंपरी,दि.११( punetoday9news):- दृष्टिहीन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश देणारे डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा होणारा दृष्टिदान दिवस उद्या (१०)आहे.मात्र हा दिवस जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा करुन अवघा महाराष्ट्र त्यांना विसरला की काय,असे वाटावे ही खरी शोकांतिका असल्याचे मत नेत्रदान जनजागृती करणारे सामाजिक कार्यकर्ते पराग कुंकुलोळ यांनी व्यक्त केले आहे.
आयुष्यात आलेल्या अंधारातून प्रकाशाचा मार्ग शोधणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देणारा हा दिवस.शासकीय सेवेत नेत्रचिकित्सक म्हणून अहोरात्र झटणाऱ्या डॉ. भालचंद्र यांचे नाव अजरामर आहे.यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यात १०जून १९२४ रोजी झाला.खडतर परिस्थिवर मात करत त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर ऐंशी हजाराहुन अधिक नेत्रचिकित्सा पूर्ण केल्या.
दृष्टिहीन व्यक्तींचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या या दीपस्तंभाची ज्योत १०जुनलाच (१९७९) मावळली. त्या दिवसाचे औचित्य म्हणून १९८२ पासून दहा जून हा ‘दृष्टिदान’ दिवस म्हणून साजरा होतो.समाजात नेत्रदानाबाबत असणारे गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंधत्व नियंत्रण कार्यक्रम राबविले जातात.याच बरोबर अनेक सेवाभावी संस्था,सामाजिक कार्यकर्ते नेत्रदान जनजागृती अभियान राबवित आहेत. तरीही राज्यातील मृत्यूचे प्रमाण व या पश्च्यात होणारे नेत्रसंकलन या मधे मोठी तफावत आहे.या बाबत शासनाकडून प्रभावशाली यंत्रणा उभी राहणे महत्वाचे आहे. इतर राज्यांच्या तुलनेत नेत्रसंकलनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र व्यापक दृष्टिकोनातून समाजातील सेवाभावी संस्था, सार्वजनिक मंडळे, महिला बचत गट, जेष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून नेत्रदानाविषयी जनजागृती केल्यास या बाबतीत असणारे गैरसमज दूर होऊन नेत्र संकलनाचे प्रमाण वाढू शकते. नेत्रदान प्रक्रिया अत्यंत सुलभ असल्याने या बाबत समाज प्रबोधन होणे महत्वाचे आहे.
राज्यातील नेत्रपेढ्या नेत्रदानाबाबत विविध कार्यक्रम घेत आहेत. यामुळे काही प्रमाणात जनजागृती होते मात्र शहरी भागा बरोबरच ग्रामीण भागातही या बाबतीत आजही उदासीनता जाणवते. नेत्रदाना बाबत समाजप्रबोधन होणे ही काळाची गरज आहे.
Comments are closed