निगडी,दि.११( punetoday9news):- निगडी प्राधिकरण से.25 मधील सावरकर सदन येथील सिमेंट रोड च्या कामामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रामुख्याने वीजेची केबल वारंवार तोडली जाते, पाण्याची पाईप लाईन , टेलिफोन ची केबल ही वारंवार तुटून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक व कामगार यांच्यातही अनेक वेळा वाद निर्माण होतात. हा रस्ता मुख्य रहदारीचा असुन रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी नागरवस्ती आहे.
रस्त्याचे काम करताना वाहतूक सुरळीत चालू ठेवण्याचा कसलाही विचार न केल्याची नागरिकांची तक्रार आहे. रस्ता एका बाजूला पुर्ण करुन दुसरी बाजू वाहतूक साठी ठेवायला हवी मात्र याठिकाणी ठेकेदाराकडून सर्व सस्ता खोदला आहे. नागरिकांना चालण्याची सुध्दा सोय नाही. रस्त्यावर रोडारोडा,मोठे पाइप,पडलेले आहे. पावसाळा सुरू होऊनही पावसाचे पाणी जाण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही त्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्याची भरपाई मिळावी व पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी व बेजबाबदार ठेकेदार वर कार्यवाही करावी अशी मागणी बाळा दानवले (उपशहराध्यक्ष, मनसे पिंपरी-चिंचवड शहर) यांनी निवेदनाद्वारे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केेेेली आहे.
यावेळी नगरसेवक सचिन चिखले, शहर अध्यक्ष, रुपेश पटेकर शहर सचिव , बाळा दानवले उपशहराध्यक्ष , सुरेश सकट उपविभाग अध्यक्ष, ओंकार पाटोळे उपविभाग अध्यक्ष ,दिपेन नाईक प्रभाग अध्यक्ष प्राधिकरण ,प्रसाद मराठे वाॅर्ड अध्यक्ष प्राधिकरण ,रुषिकेष कांबळे शाखा अध्यक्ष उपस्थित होते.
Comments are closed