आस्था हँडीक्राफ्ट्स चा व्हिजन ग्रीन इंडिया प्रकल्प.
पिंपरी,दि.१२( punetoday9news):- स्फोटके, हत्यार, तलवारी व बॉम्ब यातून विध्वंस निर्माण होतो देशात क्रांती घडविण्यासाठी हे उपयोगी नाही.मात्र आस्था हँडीक्राफ्ट्स च्या माध्यमातून दृष्टिहीन व्यक्तींनी निर्माण केलेले सीड बॉल हिंदुस्थानात हरित क्रांती घडवतील असा विश्वास पिंपरी-चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला.
दृष्टिदान दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात दृष्टी नसलेल्या दिव्यांग व्यक्तींची भेट घेऊन त्यांनी हरित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.चिंचवड मधील आस्था हँडीक्राफ्ट्स च्या माध्यमातून साकारलेल्या या उपक्रमाला आयुक्तांनी भेट दिली.या प्रसंगी प्रकल्पाचे संस्थापक पराग कुंकुलोळ, प्रणव पाठक,जितो चे अध्यक्ष संतोष धोका,जैन कॉन्फरन्स चे पदाधिकारी प्रा.अशोक पगरिया,नितीन शिंदे,विश्वास काशीद आदि मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आयुक्तांनी वृक्ष पूजन करून सीड बॉल मातीत रुजविले. ज्यांच्या कडे दृष्टी नाही त्यांच्या कडे दूरदृष्टी असते.अशा व्यक्ती आपले लक्ष कामात केंद्रित करून यश संपादन करतात.आस्था हँडीक्राफ्ट्स ने आज सीड बॉल च्या माध्यमातून बीज रोवले आहे.हा विशाल वट वृक्ष उद्याच्या हरित भारताला प्रफुल्लित करेल.युवकांच्या मध्ये असणारी शक्ती ही अद्भुत आहे.समाजात अशा युवकांनी राबविलेल्या हा प्रकल्प देशाला समर्थक बनवेल.देशात एक हरित क्रांती सीड बॉल च्या माध्यमातून होत आहे ही अभिमानाची बाब आहे.असे मत आयुक्तांनी व्यक्त केले.
दृष्टिहीन व्यक्तींच्या व्यथा,वेदना व गरजा विचारात घेऊन त्यांच्या रोजगाराच्या समस्या आस्था राखी व सीड बॉल च्या निर्मितीतुन सुटतील.भविष्यात चारशेहुन अधिक दिव्यांग व्यक्ती या कामात कार्यरत होतील असा विश्वास पराग कुंकुलोळ यांनी व्यक्त केला. जितो हे व्यावसायिक व सामाजिक संघटन या प्रकल्पाला पाठबळ देणार असल्याचे संतोष धोका यांनी सांगितले.या प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रा.पागरिया यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.एक हजार सीड बॉल चे पॅकेट विद्यार्थ्यांना देणार असल्याचे सांगितले.
मनीष ओस्तवाल यांनी सूत्रसंचालन केले. प्रणव पाठक यांनी आभार मानले.
हम होंगे कामायब…!
आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या आगमनाची चाहूल लागताच दृष्टीहीन बांधवांनी ‘जयहिंद’ सर म्हणत त्यांचे स्वागत केले.इतनी शक्ती हमे दे ना दाता ही प्रार्थना व हम होंगे कामयाब या गाण्याच्या माध्यमातून दृष्टिहीन व्यक्तींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
Comments are closed