माळी महासंघ पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने आयोजन.

 

मोशी, दि. १४(  punetoday9news):- माळी महासंघाचे चे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने रक्तदान शिबिराचे मोशी येथे आयोजन करण्यात आले होते.

अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.याप्रसंगी माळी महासंघ विश्वस्त काळूराम (आण्णा) गायकवाड,प्रदेश उपाध्यक्ष हिरामनजी भुजबळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अतुलजी क्षीरसागर, पुणे शहर अध्यक्ष दिपक जगताप, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सुरेश आल्हाट, पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगरसेवक धनंजय आल्हाट, वसंत बोराटे, माजी नगरसेवक तथा महावितरण समिती सदस्य अरुण बोराटे, युवा नेते निलेश बोराटे, प्रकाश आल्हाट, शांताराम आल्हाट, संदीप आल्हाट, तालीम चित्रपटाचे आणि महात्मा फुले यांच्या जीवनावर येऊ घातलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अप्पा बोराटे, विठ्ठल आल्हाट, तुकाराम आल्हाट, रोहित आल्हाट, अक्षय आल्हाट, सुदाम आल्हाट, तुकाराम कुदळे, राम आल्हाट, दिलीप बनकर, मनीषा कुदळे, रुपेश आल्हाट, योगेश आल्हाट, भानुदास आल्हाट, गुलाब आल्हाट, राजाभाऊ बोराटे, हनुमंत आल्हाट, बाळासाहेब आल्हाट, हरिभाऊ आल्हाट, अरुण बोराडे आदी उपस्थित होते.

भोसरी येथील संजीवनी रक्त पेढीचे या उपक्रमासाठी योगदान मिळाले.कार्यक्रमाचे आयोजन माळी महासंघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सुरेश उर्फ गोविंद आल्हाट यांनी केले.

 

Comments are closed

error: Content is protected !!