सांगवी,दि.१५( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी येथे ‘सांगवी विकास मंच’ तर्फे ‘प्रथम इम्पोर्टेड फाउंडेशन’ च्या माध्यमातून गरजू युवक-युवतींसाठी डिजिटल साक्षर हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
यामध्ये संगणकाचे पायाभूत अत्यावश्यक ज्ञान सांगवी परिसरातील युवकांना देण्यात येणार आहे. यामध्ये एम.एस.पेंट, एम.एस.वर्ड, एम.एस.एक्सेल, एम.एस.पावर पॉइंट, इंटरनेट, यु.पी.आय इत्यादी एप्लीकेशन चे ज्ञान मोफत दररोज एक तास याप्रमाणे दोन महिने देण्यात येणार आहे.
तसेच आयटी स्कील ऑनलाईन ट्रेनिंग देण्यात येणार आहे यामध्ये कम्युनिकेशन, टीम वर्क, लीडरशिप, इंटरव्यू आणि डिसिजन मेकिंग, सेल्फ मोटिवेशन स्किल्स इत्यादी ज्ञान विनामूल्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कोर्सचे प्रमाणपत्र व नोकरी साठी रोजगार मेळावाही आयोजित केला जाणार आहे.
अशी माहिती ‘सांगवी विकास मंच’ च्या प्रमुख नीलिमा महेश भागवत व कार्याध्यक्ष ओंकार महेश भागवत यांनी दिली आहे
या मोफत कोर्स मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 9970111318 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed