मोरवाडी,दि.१६( punetoday9news):- मोरवाडी पिंपरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक चौक येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याची दर रविवारी पुष्पहार अर्पण करून पुजा केली जाते दि.३१ मे २०१५ रोजी पुतळ्यास मेघडंबरी नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे , पालिकेतील अधिकारी वर्ग व समाज बांधवच्या पुढाकाराने करण्यात आली. दिपक भोजने यांच्या कल्पनेतून समाज बांधव एकत्रित आणण्यासाठी पुजेचा उपक्रम सुरू करण्यात आला.
दि.६ जुन २०१५ पासून प्रत्येक रविवार अखंडित पुजा होत असून ६ वर्ष पूर्ण झाले.करोना काळातही शासकीय नियम पाळुन पुजा करण्यात आली या पुजेच्या निमित्ताने विविध उपक्रम सुध्दा राबविण्यात आले.
६ व्या वर्धापनदिनानिमित्त विजय भोजने उपअभियंता तथा प्रवक्ता बीआरटीएस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात आली यावेळी विजय भोजने म्हणाले की हा जो उपक्रम शहरातील समाज बांधवांनी राबवला आहे यांचे महाराष्ट्रभरातून कौतुक होत आहे पुजेचे निमित्ताने ज्यास्तीत ज्यास्त समाज बांधव एकत्रित होतील या सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे त्यांनी दिपक भोजने व त्याच्या सहकारी यांचे कौतुक केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती व दर रविवारच्या साप्ताहिक पुजेच्या निमित्त आनोखे अभिवादन करण्याचे ठरविले प्रत्येक समाज बांधव शैक्षणिक साहित्य २०० पानी वही व एक पेन भेट करा व इतरांना सांगा जमा झालेल्या शैक्षणिक साहित्य समाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येणार आहे विशेष सहकार्य केल्याबद्दल गणेश एकळ , विजय महानवर , बंडू लोखंडे , राहुल मदने , दादासाहेब कोपनर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दत्ता पाटील महावीर काळे, महादेव देशमुख , संजय कवितके, धनजय गाडे , सुनिल बनसोडे , विभिषण घोडके, दादा खरात , विनोद बरकडे, आशोक महानवर इतर समाज बांधव उपस्थित होते दिपक भोजने यांनी आभार मानले.
Comments are closed