पुणे, दि. 17( punetoday9news):-  महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत शौर्य पदक प्राप्त राज्यात अधिवास असलेल्या शौर्य पदकधारक सैनिक व सैन्य अधिकारी यांचे जिल्हयामध्ये उभारण्यात आलेल्या पुतळयाची माहिती कळविण्यात यावी असे आवाहन मेजर सुभाष सासने, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

आपल्या गावात, गल्लीमध्ये किंवा शहरामध्ये रहात असलेल्या ठिकाणी असे पुतळे असल्यास शौर्यपदक धारकाच्या किंवा शहीदाच्या पुतळयाच्या नावासहित माहिती संपर्क क्रमांक 9970856438, 9930429346 अथवा 9518571892 यावर कळवावी. असे आवाहन करण्यात आले आहे .

Comments are closed

error: Content is protected !!