पिंपरी,दि.18( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून कुदळवाडी आणि परिसरातील नागरिकांची ‘ॲन्टीबॉडी’ तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांच्या पुढाकाराने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
कुदळवाडी येथील महापालिका शाळेत ॲन्टीबॉडी टेस्ट तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी महापालिका वैद्यकीय सुनिता साळवी, डॉ. राहुल साळुंखे, डॉ. प्रियंका शिर्के, विशाल बालघरे, अनिल यादव, प्रकाश बालघरे, गणेश मोरे, काका शेळके, प्रकाश चौधरी, शिवराज लांडगे, कुमार होले आदी उपस्थित होते.
स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेवून शहरात ‘सिरो सर्व्हे’ करण्यात येणार आहे. त्याद्वारे नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात येत आहेत. त्याद्वारे ‘ॲन्टीबॉडी’ तपासणी करुन नागरिकांमध्ये रोग प्रतिकारकशक्ती तयार झाली आहे का? याचा सर्वे केला जात आहे. त्याद्वारे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पुढील उपचार करणे शक्य होणार आहे.

रुग्णसंख्य कमी, तरीही काळजी घ्या.
शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असून ही समाधानकारक बाब असली, तरी तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य आणि प्रशासन विभागास त्याअनुषंगाने तयारी प्रशासन करीत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी रुग्ण संख्या कमी झाली, म्हणून गाफील राहुन चालणार नाही. आपण आपल्यासह कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केले.

 

#

Comments are closed

error: Content is protected !!