पिंपरी,दि.१८( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत शाळांची यादी शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली असून पालकांनी आपल्या मुलांना या शाळेत प्रवेश न घेण्याचे आवाहन केले आहे. 

शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे की, सर्व संबंधित संस्थाचालक व पालकांना कळविणेत येते की , सन २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षात पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील खालील खाजगी प्राथमिक शाळा शासनाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतरित्या चालविण्यात येत असून यापुर्वी सदर शाळांना शाळा बंद करणेबाबत नोटीसही दिलेल्या होत्या . असे असतानाही या शाळा अनधिकृतरित्या चालू ठेवण्यात आलेल्या आहेत .

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित पालकांना या निवेदनाद्वारे कळविणेत येते की , त्यांनी आपल्या पाल्यास या अनाधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेवू नये , या अनधिकृत शाळेत प्रवेश घेतल्यास , त्यांच्या पाल्याच्या होणा-या शैक्षणिक नुकसानीस ते स्वत: जबाबदार राहतील .

तसेच या निवेदनाद्वारे संबंधित शाळा चालकास कळविणेत येते की , त्यांनी शासन परवानगी घेऊनच शाळा सुरु कराव्यात . अनधिकृतपणे शाळा सुरु केल्यास किंवा चालू ठेवल्यास दिनांक १ ९ / ०६ / २०१० अन्वये त्यांचे विरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी , अनधिकृत खाजगी शाळेचे नाव व पत्ता

१ ) ग्रेट मीरा इंग्लिश मिडीयम स्कुल , कुदळवाडी (इंग्रजी माध्यम)

२) मास्टर केअर इंग्लिश स्कुल , भोसरी (इंग्रजी माध्यम)

३ ) ज्ञानराज प्राथमिक शाळा , कासारवाडी (मराठी माध्यम)

४ ) ज्ञानसागर इंग्लिश स्कुल ( प्राथमिक ) चिखली (इंग्रजी माध्यम)

५) मॉर्डन पब्लिक स्कुल , रहाटणी (इंग्रजी माध्यम)

६) एम.एस. स्कुल फॉर किड्स , सांगवी (इंग्रजी माध्यम)

अशी माहिती ज्योत्स्ना शिंदे , प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग (प्राथमिक) पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी दिली आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!