पुणे, दि. १८( punetoday9news):- प्रशिक्षण संस्था ही संस्कार करण्याची जागा असते. प्रशिक्षण कालावधीत घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग सामाजिक उत्तरदायित्व म्हणून शासन व समाजासाठी काम करण्याची अपेक्षा परिवहनमंत्री ॲड अनिल परब यांनी व्यक्त केली.


परिवहनमंत्री ॲड अनिल परब यांनी आज दापोडी येथील कार्यशाळेत नवनियुक्त प्रशिक्षणार्थी सहायक वाहन मोटार निरीक्षकाच्या तुकडीस मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस आयुक्त एन.डी. चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, कार्यशाळा व्यवस्थापक खैरमोडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थीं उपस्थित होते.
परिवहनमंत्री ॲड परब म्हणाले, प्रशिक्षण काळात घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग येत्या काळात अवैध वाहतुकीस आळा घालण्यासाठी करा.

आधुनिक काळात बदलत्या तंत्रज्ञानानुसार स्व:तला अद्यावत ठेवा. ज्ञानाचा उपयोग शासन सेवा व नागरिकांसाठी करण्याचे आवाहन करत परिवहन सेवा ही गरिबाची जीवनवाहिनी आहे. तसेच त्यांनी प्रशिक्षणार्थींना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले, येत्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची आपली जबाबदारी आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या मदतीने गुणवत्तापूर्ण काम करुन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील रहावे लागेल. त्यामुळे नागरिकांच्या मनात आणखी प्रतिमा उंचावण्यास मदत होईल. परिवहन विभागामार्फत नागरिकांसाठी आज अखेर 87 सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी केले तर प्रशिक्षाणार्थी सुवर्णा चव्हाण यांनी आभार मानले.

 

Comments are closed

error: Content is protected !!