सांगवी,दि. २०( punetoday9news):- सांगवी परिसर महेश मंडळ पुणे (माहेश्वरी समाज) महेश नवमी (समाज उत्पत्ती दिन ) उत्साहात साजरा करण्यात आला . नवी सांगवीतील माहेश्वरी चौकात भगवान शंकराच्या मूर्ती ला सकाळी मंडळाच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नगरसेविका शारदा सोनावणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली .
तदनंतर ग्राम रिहे, तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील वेदांत वारकरी गुरुकुल (आश्रम शाळा) येथे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सांगवी परिसर महेश मंडळाच्या वतीने गुरुकुलास त्यांना अत्यंत गरजेच्या असलेल्या वस्तू पिठाची गिरणी, बॅटरी, इन्व्हर्टर भेट म्हणून देण्यात आल्या. ह्याचा स्वीकार ह.भ.प निवृत्ती बोरकर महाराज यांनी स्वीकार केला .
या वेळी अध्यक्ष सतीश लोहिया यांनी असे सांगितले कि महेश नवमी निमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या इतर कार्यक्रमाला होणारा खर्च टाळून विधायक कार्यासाठी करण्याचे ठरवले त्या माध्यमातून हया कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले .
यावेळी ह भ प निवृत्ती बोरकर महाराज ह्यांनी कार्यकर्त्यांना नेतृत्व व दातृत्व ह्या विषयांवर मार्गदर्शन केले. ह्या भेटवस्तू गुरुकुलासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत असे प्रतिपादन बोरकर महाराजांनी केले.
या वेळी अध्यक्ष सतीश लोहिया, अतुल नावंदर, निलेश अटल, सचिन मंत्री, सत्यनारायण राठी, मनोज अटल, महिला अध्यक्षा पद्मा लोहिया उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर जांभूळकर ह्यांनी केले तर आभार भूषण हरकुट यांनी मानले.
Comments are closed