पुणे,  दि. २१( punetoday9news):- पुणे शहरातील शिक्षण विभागाकडून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला .  सकाळी ७ ते ८ या वेळेत पुणे महानगरपालिका हददीतील सर्व माध्यमाच्या शाळांमधील सर्व विद्यार्थी , पालक , शिक्षक , सेवक यांनी पुणे महानगरपालिकांच्या यूट्यूब चैनेलवर https://youtu.be/4PkDShi3usU या लिंकद्वारे योग दिनासाठी सहभाग नोंदवला.

यामध्ये २३३५७ व्यक्तींनी सहभागी होऊन प्रोटोकॉल नुसार योगदिन ऑनलाईन साजरा केला . शिक्षण विभाग पुणे महानगर पालिका संचलीत सर्व माध्यमाचे शाळांमधील २४९५२ विधानी , पालक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर लिंकद्वारे व व्हॉट्सॲप चे माध्यमातून प्रोटोकॉल नुसार योगदिन ऑनलाईन साजरा केला . कोवीड १९ च्या संदर्भात योग्य ती काळजी घेवुन सुरक्षित अंतर ठेवुन एकूण ४८३०९ विद्यार्थी , पालक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , अधिकारी , पदाधिकारी खाजगी शाळा विद्यार्थी, पालक , शिक्षक यांनी योगादिन साजरा केला .

सदर कार्यक्रम प्रसंगी मंजुली खईकर अध्यक्षा शिक्षण समिती पुणे मनपा , कालिदा पुड़े उपाध्यक्षा शिक्षण समिती पुणे मनपा . मिनाक्षी राऊत प्रशासकीय अधिकारी पुणे मनपा यांनी योग दिनासाठी सर्व सहभागी विद्यार्थी शिक्षक यांना शुभेच्छा दिल्या .

सदर कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिका शिक्षण समितीच्या सर्व सभासदांचे अनमोल मार्गदर्शन लाभले . सदर कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन माणिक देवकर , सहाय्यक प्रशासकीय अधिकारी कीडा विभाग , सुनिल ताकवले सहायक प्रशासकीय अधिकारी कीडा  ,  भूषण बहिरमे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी कीडा विभाग यांनी केले . कार्यक्रमासाठी तांत्रिक सहकार्य माणिक सोलवलकर तंत्रस्नेही शिक्षक व गिरी यांनी केले . तसेच या कार्यक्रम प्रसंगी योगासनांची संपूर्ण प्रात्याक्षिक जयदीप वंदावणे कला शिक्षक पुणे मनपा व डॉ . सौ . लता पाडेकर शिक्षिका पुणे मनपा यांनी केले .

या आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका क्रीडा  विभागाचे प्रमुख राजेंद्र कुमणे यांनी सर्व सहभागी विद्यार्थी शिक्षक व या कार्यक्रमासाठी सहकार्य करणा-या सर्वाचे आभार मानले.

 

Comments are closed

error: Content is protected !!