पुणे दि. २४( punetoday9news):-  स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत लघुपट (Short Film) स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार स्वच्छता फिल्मोका अमृत महोत्सव लघुपट (Short Film) स्पर्धेचे दिनांक १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या लघुपट स्पर्धेमध्ये वैयक्तिक व संस्थात्मक स्तरावर सहभाग घेता येणार आहे. या स्पर्धेत २ श्रेणीत ODF Plus लघुपट निर्माण करावयाचे आहे.

१) स्वच्छता विषयक श्रेणी १
१. जैव विघटन कचरा व्यवस्थापन (Bio-degradable waste )
२. गोवरधन. (GOBAR dhan)
३. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (plastic waste management )
४. घरगुती वापर पाण्याचे व्यवस्थापन (Grey water management).
५. मैला मिश्रीत पाण्याचे व्यवस्थापन (Faecal sludge management)
६. वर्तणूक बदल (Behaviour change)

२) भौगोलिक श्रेणी २
१. वाळवंट. २. डोंगरी भाग ३. समुद्रा भाग, ४. सपाट, ५. पुरग्रस्त
वरील प्रमाणे विषय व भौगोलिक श्रेणी प्रमाणे लघुपटामध्ये ODF Plus बाबत घन कचरा सांडपाणी या विषयावर नाविण्यपूर्ण संदेशाबाबत लघुपट आधारित असावा.
लघुपट (Short Film) स्पर्धा राष्ट्रीय स्तरावरची असून सहभागी स्पर्धकांनी आपले वरील विषयाशी संबंधित लघुपट (Short Film ) तयार करुन जिल्हाकक्षाकडे दि. 8 ऑगस्ट 2021 कार्यालयीन वेळेपर्यंत सादर करावेत. जिल्हा कक्षाकडे प्राप्त लघुपट (Short Film) एकत्रीकरण करुन दिनांक १० ऑगस्ट २०२१ रोजी केंद्र स्तरावर सादर करण्यात येणार आहे. याकरीता उत्कृष्ठ लघुपटास केंद्र शासनांकडून प्रमाणपत्र व आकर्षक बक्षीस देण्यात येईल.

लघुपट (Short Film) स्पर्धा, मार्गदर्शक सूचना
ODF PLUS विषयक लघुपट निर्मिती
• लघुपट वेळ मर्यादा : कमाल १ ते ५ मिनिट ५

• लघुपट भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत लघुपट सादरकरता येईल..

• लघुपट विषय श्रेणी : १. जैव विघटन कचरा व्यवस्थापन (Bio-degradable waste
२. गोवरधन. (GOBAR dhan)
३. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (plastic waste management ).
४. घरगुती वापर पाण्याचे व्यवस्थापन (Greywater management)
५. मैला मिश्रीत पाण्याचे व्यवस्थापन (Faecal sludge management)
६. वर्तणूक बदल (Behaviour change )
• भौगोलिक श्रेणी : १. वाळवंट, २. डोंगरी भाग ३. समुद्रा भाग ४. सपाट ५. पुरग्रस्त
• सादरीकरण पद्धती : लघुपट तयार करुन DVD CD किंवा पेनड्राईव्ह मध्ये जिल्हा कक्षाकडे प्रत्यक्ष आणून
देणे किंवा जिल्हाकक्षाचे nbazppune@gmail.com या ईमेलवर पाठविणे.
• लघुपट सहभागी गट : १. वैयक्तिक (वय वर्ष १० वर्षा पुढील सर्व)
२. संस्थात्मक गटात असणान्या स्पर्धकांचा प्रमाणपत्र व आकर्षक रोख बक्षीस
• लघुपट मुल्यमापनाचे निकष : विषयांशी संबंधित कल्पक आणि सुस्पष्ट विचार, साधी सरळ मांडणी, नवविचार, विषयाला पोहचविण्यासाठी असणारी परिणाम कारक मांडणी असावी.
• लघुपट सादर करण्यासाठी अंतिम दिनांक : दि. ८ ऑगस्ट २०२१ पर्यंत.

लघुपट सादर करण्याचे ठिकाण :-

१. तालुका स्तरावर स्वच्छ भारत मिशन कक्ष पंचायत समिती
२. जिल्हास्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, पुणे

• लघुपट संबंधी
लघुपट स्पर्धकाचा स्वतःचा असावा इतरांच्या मजकूराचा वापर केलेला आढळल्यास हा लघुपट स्पर्धेतून बाद करण्यात येईल.

• लघुपट मजकूर असभ्य, भितीदायक, मानहानीकारक, बदनामीकारक, लिंगभेदाधारित, अश्लिल आणि सार्वजनिक उपयोगाकरिता अनुपयुक्त असा नसावा.

• लघुपट मजकूर राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक कायद्यांचा भंग करणारा नसावा. तसेच राष्ट्राची मानहानी होईल असा नसावा.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!