खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मराठवाड्यातील हक्काचे आरक्षण मिळवून द्यावे : किशोर चव्हाण
पिंपरी, दि. 25( punetoday9news):-  सर्वोच्च न्यायालयाने पाच मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्द केले. त्यानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका टाकली असून, 102 व्या घटना दुरुस्ती संदर्भात राज्यांनाच आपल्या राज्यात आरक्षण देण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या याचिकेमुळे मराठा आरक्षणाचा विषय निकाली निघू शकतो. केंद्र सरकारने खासदार सुदर्शन नचिपयन यांनी लोकसभेत व राज्यसभेत आरक्षणाची मर्यादा वाढवणारे बिल मंजूर करून सर्वोच्च न्यायालयात शपथपत्राद्वारे सादर केल्यास इंद्रा सहानीची 50% आरक्षणाची अट रद्द होईल. तसेच मराठा आरक्षण रद्द करण्याचे मुख्य कारण 50 टक्केवर आरक्षण गेले व राज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरवले तर मराठा आरक्षण मिळू शकते, असा विश्वास मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, याचिकाकर्ते व छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
 सांगवी येथे आयोजित पत्रकार परिषदेला किशोर चव्हाण यांच्यासह प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन गवांडे पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्ष उद्धव काळे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष अशोक वाघ आदी उपस्थित होते.
मराठवाड्यातील मराठा मूळचा ओबीसी’च
        हैदराबाद राज्य होते, तेव्हा खासदार काकासाहेब कालेलकर पहिल्या आयोगाने मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला होता. आंध्रप्रदेश राज्यांनेही मराठा समाजाला ओबीसी समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट केले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. भाषा प्रांत रचनेत मराठवाडा हा महाराष्ट्रात विनाअट सामील झाला. 1967 ला महाराष्ट्र राज्याने 180 ओबीसी जातींची यादी घोषित केली. त्याचवेळी मराठवाड्यातील मराठा जातीचा ओबीसीमध्ये समावेश करणे गरजेचे होते. तेव्हापासून आजपर्यंत मराठवाड्यातील मराठा समाजावर महाराष्ट्राने अन्याय केलेला आहे. विशेष बॉम्बे प्रांतात मराठा जात ओबीसीत समाविष्ट नव्हती, पण भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, निपाणी, कारवार भाग कर्नाटक राज्यात गेला. कर्नाटक राज्यात मराठा जात ओबीसीमध्ये समाविष्ट असल्याने कर्नाटक राज्याने बेळगाव, निपाणी, कारवार भागातील मराठी जातीचा समावेश ओबीसींमध्ये केलेला आहे.
       मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर चव्हाण यांनी याचिका टाकली असून, जुलै महिन्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
 खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत बैठक
 छत्रपती शाहू महाराज जयंती दिनी कोल्हापुरात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाचे हक्काचे ओबीसी आरक्षण, तसेच मराठवाड्यातील इतर मागण्यांसंदर्भात छावा मराठा संघटनेच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी वेळ दिला आहे. मराठवाड्यातील मराठा आरक्षण व इतर मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेऊन मराठवाड्यातील मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती करण्यात येणार आहे.

 

#

Comments are closed

error: Content is protected !!