पुणे दि.25( punetoday9news):- कोवीड -19 मुळे उद्भलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे एप्रील व मे महिन्यात लॉकडाऊनमुळे विहित कालावधीत नोंदणी न झालेल्या दस्तांवर देय होणारी शास्ती महाराष्ट्र नोंदणी नियम 27 च्या प्रचलित तरतुदीप्रमाणे माहे डिसेंबर 2020 मध्ये पुर्ण मुद्रांकित व निष्पादीत अभिहस्तांतरण, विक्री करारनामा तसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील 36 (4) मधील दस्तांवर प्रथम दोन महिन्यासाठी तर माहे जानेवारी 2021 मध्ये पुर्ण मुद्रांकित व निष्पादित दस्तांवर प्रथम महिन्यासाठी देय होणारी शास्ती कमी करुन ती रु.1000/- इतकी निश्चित करण्याबाबतचे शासनाचे निर्देश प्राप्त झाले आहेत.
या सवलतीचा जास्तीत जास्त नागरीकांना लाभ मिळावा यासाठी दस्तऐवज नोंदणीची सुविधा पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-2/ दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये माहे जून महिन्यातील 26 जून 2021 या शासकीय सुट्टीच्या दिवशी सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-2 / दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालये कार्यालयीन वेळेत दस्त नोंदणी व कार्यालयीन कामकाजासाठी सुरु ठेवण्यात येत असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दि.पं पाटील यांनी एका पसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
सह दुय्यम निबंधक बारामती, बारामती क्र.2, दुय्यम निबंधक कार्यालय, आंबेगांव, भोर, दौंड, इंदापूर, नारायणगांव, केडगांव, खेड, खेड क्र. 2, खेड क्र. 3, लोणावळा, मावळ, मावळ क्र.2, मुळशी, मुळशी क्र.2, जुन्नर, पुरंदर, शिरुर, तळेगांव ढमढेरे, वेल्हा हे कार्यालय सुरु राहणार आहेत.
या संधीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पुणे ग्रामीणचे सह जिल्हा निबंधक वर्ग -1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दि.पं पाटील यांनी केले आहे.
Comments are closed