पिंपळे गुरव,दि.२७( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे शाहू महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
अशोक दुर्गुळे व रंगनाथ चौगुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून करण्यात आले. डाॅ डी.वाय पाटील रक्तपेढीचे डाॅ. कदम यांनी सर्व रक्तदात्यांची तपासणी केली. कार्यक्रमात महिला राधा चौगुले यांनीही रक्तदान केले. कार्यक्रमाचे संयोजन अनिल मगदूम यांनी केले.
यावेळी सुनिल पाटील, अजय सुतार, महादेव पाटील, प्रथमेश चौगुले, विलास थोरवत उपस्थित होते.
Comments are closed