पिंपळे गुरव,दि.२९( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघातर्फे सभासदांंचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
कोरोना प्रादुर्भावाने जेष्ठ नागरिक संघाचे कार्यालय बंद होते. त्यामुळे नियमांचे पालन करून संघातर्फे वाढदिवस साजरे करण्यात आले. सभेचे अध्यक्ष म्हणून संघाचे उपाध्यक्ष बबन रावडे उपस्थित होते.
तसेच कार्यक्रमात कार्याध्यक्ष मल्हारराव येळवे, सचिव जालंदर दाते, संचालक श्रीनिवास पानसरे, अंजलीना फर्नांडिस, सुनंदा भोज, खजिनदार नागनाथ निळेकर, सभासद राजशेखर लध्दे उपस्थित होते.
सुत्रसंचालन जालंदर दाते यांनी केले तर संचालक प्रकाश बंडेवार यांनी आभार मानले.
Comments are closed