सांगवी,दि.२९( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी येथे कोरोना काळामध्ये पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पत्रकार, होमगार्ड यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
अशा पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावत कोरोना काळात आपल्या कार्याद्वारे विशेष योगदान दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्टार्स अकॅडमी आणि जीवन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करण्यात आला. कोरोनाचे संकट अजुनही पुर्णतः संपले नसून विविध ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील काम करणारे कर्मचारी व संबंधित व्यक्ति आपले बहुमुल्य योगदान आपल्या सेवेतून देत आहेत.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठी चित्रपट सृष्टीतील चित्रपट, दिग्दर्शक व अभिनेते रामकुमार शेडगे उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस, पत्रकार, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, होमगार्ड आदींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक विशाखा सोनकांबळे जीवन फाउंडेशन ज्योती खेसे, श्री महालक्ष्मी महीला संस्था अध्यक्ष नंदा आहिरे, उद्योजक ललित खेसे, विवेक तीव्हाणे, संदीप गुंजाळ होते.
Comments are closed