● १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश.

  ● एकुण ४५० पे अँड पार्क.

 

पिंपरी, दि.२९(punetoday9news):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिके मार्फत शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी करणेत येत आहे.  त्या अनुषंगाने  दिनांक १ जुलै २०२१ पासुन पिंपरी चिंचवड शहरात पे अँड पार्क योजना लागु करण्यात येत आहे.  यात १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश असून त्यामध्ये एकुण ४५० पे अँड पार्कची ठिकाणे आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे.  त्या अनुषंगाने पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश व त्यांचे संबंधित अधिकारी आणि महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिनांक १ जुलै २०२१ पासुन पिंपरी चिंचवड शहरात पे अँड पार्क योजनेची  सुरवात करण्याचे निश्चित केले आहे. त्यामध्ये १३ मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश आहे.  पिंपरी चिंचवड शहरातील पार्किंग पॉलिसी धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मे. निर्मला ऑटो क्रेन सेंटर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील सर्व पार्किंग ठिकाणांची माहिती सर्व नागरिकांना व वाहन चालकांना होण्यासाठी यादी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द  करण्यात आली आहे. याठिकाणी शहरामध्ये पे अँड पार्क योजना  दि. १ जुलै २०२१ लागु करण्यात येत आहे. त्यास लागुन असलेल्या नो पार्किंगच्या ठिकाणांच्या  यादी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय  (वाहतुक विभाग)  प्रसिध्द करणार आहे.

सदर पार्किंग ठिकाणांची  यादी खालीलप्रमाणे –

रस्त्यांवरील (ऑन स्ट्रीट पार्किंग)  नावे

१. टेल्को रोड  — ५६

२. स्पाईन रोड-  ५५

३. नाशिक फाटा वाकड बीआरटीएस रस्ता- ४१

४. जुना मुंबई पुणे रस्ता –  ५८

५. एम. डी.आर. –३१    – ३९

६. काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता – ३६

७. औंध रावेत रस्ता- १६

८. निगडी वाल्हेकरवाडी रस्ता  -२९

९. टिळक चौक ते बिग इंडीया चौक  -८

१०. प्रसुनधाम सोसायटी रोड- ११

११. थेरगाव गावठाण रोड- १२

१२.नाशिक फाटा ते मोशी रोड – २४

१३. वाल्हेकरवाडी रोड- १५

उड्डाणपुलाखालील जागा/ ऑफ स्ट्रीट पार्किंग

१. राँयल ग्लोरी सोसायटी वाकड

२. रहाटणी स्पॉट – १८ मॉल

३. अंकुशराव लांडगे भोसरी सभागृह- भोसरी

४. रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड

५. भक्ती शक्ती फ्लाय ओव्हर- निगडी

६. एम्पायर ईस्टेट फ्लाय ओव्हर- चिंचवड

७. चाफेकर चौक ब्लॉक – १ चिंचवड

८.चाफेकर चौक ब्लॉक – २ चिंचवड

९. पिंपळे सौदागर वाहनतळ

१० मधुकर पवळे उड्डाण पुल निगडी

 

Comments are closed

error: Content is protected !!