● नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन.
पुणे, दि. 30( punetoday9news):- देहुरोड वाहतूक विभाग हद्दीतील भागात देहूरोड बाजार येथुन पुणे बाजूकडे जाणारा सर्व्हीस रोड तसेच मुंबई पुणे जुना हायवे ते नविन रेल्वे ब्रिज यांना जोडणारे अंदाजे 50 मीटर एप्रोच रॅपचे तसेच रिटेनिंग बॉल चे काम करण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस उप- आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे होण्यासाठी मोटार वाहन कायदयानुसार पिंपरी चिंचवड शहर यापूर्वी काही निर्बंध असतील ते रद्द करण्यात येत असून तात्पुरत्या स्वरुपात खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहे.
देहूरोड-तळेगाव वाहतूक विभाग
देहुरोड सवाना चौकातुन निगडी कडे जाणारा सर्व्हीस रोड सर्व वाहनांकरीता बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग- सवाना चौक- आधार हॉस्पीटल- स्वामी चौक- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पीटल- सेन्ट ज्यूड स्कुल पंचर समोरुन वळुन गुरुद्वारा समोरुन जुना मुंबई पुणे हायवे उडडानपुलावरुन निगडी बाजुकडे वळविण्यात येणार आहे.
सदरचे आदेश दि. 28/6/2021 पासून 11/08/2021 या कालावधीकरीता राहील. तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. वरील प्रमाणे वरील वाहतूक बदलाबाबत वॉर्डन व वाहतूक कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक शाखेकडून करण्यात येत आहे
Comments are closed