पुणे, दि.१ ( punetoday9news):- महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे व गलथान कारभारामुळे राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. या कामी राज्य सरकारने आवश्यक त्या न्यायालयीन बाबींची वेळेत पूर्तता केली नाही. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण तीन अटींची पूर्तता करण्यापर्यंत स्थगित केले आहे. आघाडी सरकारच्या ओबीसी सहित सर्वच घटकांच्या आरक्षण विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी व प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने येत्या रविवारी (दि. 04) 11 वाजता कात्रज चौक येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री, आमदार महादेव जानकर यांच्या उपस्थितीत जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे शहराध्यक्ष विनायक रुपनवर यांनी दिली.
आंदोलनातील प्रमुख मागण्या :
1) राज्य सरकारने ओबीसी (इतर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून न्यायालयीन बाबींच्या पूर्ततेसाठी काम सुरू करावे).
2) ओबीसी समाजाचा इपीरियल डाटा तातडीने जमा करून न्यायालयात पाठवावा.
3) ओबीसी आरक्षण स्थगित जोपर्यंत उठवली जात नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत.
Comments are closed