सांगवी,दि.१( punetoday9news):- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर व कै. शांताराम बाईत प्रतिष्ठान यांच्या वतीने आज डॉक्टर्स डे निमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या डॉक्टरांचा प्रशांत शितोळे, राजेंद्र जगताप, रविंद्र बाईत व अस्मिता कांबळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी डॉ.किरण माकन, डॉ. विजया आंबेडकर, किशोरकुमार हांडे, शारदा कोकरे, गोविंद नरके, तुषार जाधव, सुप्रिया बिराजदार, कुंदन पाटील ,वर्षा गवई , विनया राठोड, विशाल मनतोडे, ममता सिंग, जयेंद्र चव्हाण, भुषण पाटील, किशोर सोलस्कर, नेहा सुकटे, ट्विंकल राठोड, दिपीका भुवा, अश्विनी म्हेत्रे, क्षितीजा गोगडे, निलम कालोखे, स्नेहा अस्तुहा, सविता बालशेखरे, सृष्टी वाघमारे, मृणाल राजगुरू, प्रांजली कराले, अनिकेत ताटे, नेहा राऊत, मेघा सुर्यवंशी, मोहिनी ठेंगळे, शुभांगी शिंदे, अदिती शिवले, राजगौरी पाँल, अविरत नवले, विद्या कोरे, तुषार मानतोडे, सचिन लकडे, विजेंद्र दुधमल, चंद्रशेखर हिंगे, कविता नरोले आदी डॉक्टर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशांत शितोळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले मागील दोन वर्षात डॉक्टरांनी समाज सेवेची मोलाची भूमिका बजावली आहे. सर्व जगातील मानवसेवेचे व्रत डॉक्टरांनी घेतलेले आहे. सर्व मानवजातीच्या रक्षणासाठी त्यांनी दिवसरात्र एक करून आपल्या कामाचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. वेळप्रसंगी आपल्या घरादाराची पर्वा न करता रूग्ण सेवा केलेली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रविंद्र बाईत यांनी केले.
Comments are closed