मुंबई,दि.२( punetoday9news):-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे मध्ये विभागप्रमुख (योजना-1 विस्तार सेवा-1) – दोन पदे, निबंधक एक पद,कार्यालय अधीक्षक सात पदे अशी एकूण दहा पद भरती साठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

ही पदे राज्य व केंद्र शासनाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामधून प्रतिनियुक्तीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

विभागप्रमुख (योजना-1 विस्तार सेवा-1) दोन पदे, निबंधक एक पद, कार्यालय अधीक्षक सात पदे अशी एकूण दहा पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.पदांची अर्हता,पात्रता,वेतनस्तर,पदाचे कर्तव्य व जबाबदा-या या संदर्भात अधिक माहितीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे यांचे संकेतस्थळ https://barti.maharashtra.gov.in>NoticeBoard ला भेट द्यावी या पदांसाठी अर्ज महासंचालक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे, 28 क्वीन्स गार्डन, जुन्या सर्किट हाऊसजवळ, पुणे 411 001. या पत्यावर 31 जुलै 2021 पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे चे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!