वाकड,दि.२( punetoday9news):- महापालिकेच्या वाकड प्राथमिक शाळेत ज्ञानदानाचे पवित्रकार्य करणारे आदर्श शिक्षक, उत्तम लेखक चंद्रकांत सोनवणे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने त्यांना निरोप देत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पर्यवेक्षक सुनील लांघी (वाकड), रविंद्र शिंदे (चिंचवड), मुख्याध्यापक अशोक उनवणे, रामचंद्र पिसे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मुख्याध्यापिका शोभा सुर्यवंशी, सविता गायकवाड, शिवाजी दौंडकर, शैलेश कमलाकर, भारती पावसकर, रंजना जोशी, वासंती चव्हाण,अश्विनी पाटील, सरिता विधाते, नेहा शेलार, प्रमिला कापडणीस, नीलिमा सोनवणे, दाविद साबळे, उमेर शेख, जरांडे आदी उपस्थित होते.
शुभेच्छा देताना रामचंद्र पिसे म्हणाले, चंद्रकांत सोनवणे सर हे उपक्रमशील, हसतमुख, शांत स्वभावाचे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. कृतीयुक्त, हसतखेळत शिक्षणावर त्यांचा भर असे. धार्मिक, सामाजिक, साहित्य क्षेत्रात त्यांचे योगदान अनमोल आहे. त्यासाठी अनेक संस्थानी राज्य आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांनी विविध विषयांवर एकूण १३ पुस्तकाचे लेखन केले आहे.
प्रशासकीय अधिकारी पराग मुंढे, नगरसेवक राहुल कलाटे यांच्यासह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन शिवाजी दौंडकर यांनी केले व प्रदर्शन सविता गायकवाड यांनी आभार मानले.
Comments are closed