बांधकाम व्यावसायिक अरूण पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती.
पिंपरी,दि.3 (punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील एकाने फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करून व खोट्या सह्या करून फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच याबाबत विचारणा केली असता फ्लॅटधारकला व त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी बांधकाम व्यावसायिक अरूण पवार यांनी केली आहे.
सांगवी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जात बांधकाम व्यावसायिक अरुण पवार यांनी म्हटले आहे, पिंपळे गुरव येथील माझे व्यवसायिक भागीदार जीवन जाधव यांना सावकारी कर्जातून एका इसमाकडून काही रक्कम देण्यात आली होती . मात्र या व्यवहाराचा आणि माझा काही संबंध नाही. तरीही संबंधित व्यक्तिने आमच्या विरुद्ध खोटी कागदपत्रे व बनावट सह्या करून शिवाजीनगर न्यायालयात तक्रार दाखल केलेली आहे. यावर आम्ही वकिलामार्फत आमची बाजू स्पष्ट केली आहे.
तरीही गाववाला व बाहेरवाला भेदभाव दाखवत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असून वाकड येथील फ्लॅट दिला नाही, तर मला व माझ्या कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देत अंगावर धावून आल्याचे अरुण पवार यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.
याबाबतचा तक्रार अर्ज पोलीस आयुक्त, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांगवी पोलीस ठाणे यामध्ये दाखल केला आहे. तरी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अरुण पवार यांनी केली आहे.
Comments are closed