मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण.

 

पुणे,दि.३(punetoday9news):-  मराठा समाजाचे ओबीसीकरण व ओबीसी आरक्षणाचे संरक्षण, तसेच२१८५ मराठा तरुणांच्या रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ करणे प्रश्नांसाठी दिनांक ०५ व ०६ जुलै २०२१ रोजी होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात भूमिका मांडुन मराठा ओबीसीकरणासाठी विशेष अधिवेशन भरवून राज्यपाल यांच्यामार्फत मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा अशी मागणी करण्यात आली .

मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करून न्याय मिळवून देईल असे शिरूर हवेली चे आमदार अशोक बापू पवार यांनी सांगितले.

संभाजी ब्रिगेड पुणे शहर जिल्हा टिमने घेराव घालून शिरूर लोकसभा खासदार अमोल कोल्हे यांना भेटून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी तसेच मराठा आरक्षणा साठी केंद्र सरकारला आग्रह करावा,अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली .

मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास संभाजी ब्रिगेड आमदार, खासदारांना पुणे शहरात फिरू देणार नाही असा इशारा शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी दिला,
यावेळी आंदोलनाला ब्रिगेड चे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शहर उपाध्यक्ष जोतिबा नरवडे, महिला आघाडी च्या मोहिनी रणदिवे, संध्या माने, मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष जयदीप रणदिवे, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, सोशल मिडिया जिल्हा उपाध्यक्ष अशोक फाजगे, जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, कामगार आघाडी संघटक अंकुश हाके, जिल्हा संघटक हनुमंत गुरव, वाहतूक आघाडीचे इस्माईल शेख, यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!