चिंचवड,दि.४(punetoday9news):- श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व कल्याण प्रतिष्ठान यांच्या वतीने आचार्य सम्राट आनंद ऋषीजी म.सा.यांचे शिष्य व वर्तमान आचार्य डॉ.शिवमुनिजी म.सा.यांचे अनुयायी जैन युवा चार्य महेंद्र ऋषीजी म.सा.व हितेश ऋषीजी म.सा. तसेच उपप्रवर्तीनी साध्वी रत्ना प.पू. सन्मतीजी म.सा.आदी ठाणा पाच यांचा चातुर्मास चिंचवडगाव येथे होणार आहे.सोमवार(५जुलै) सकाळी त्यांचे पिंपरी-चिंचवड शहरात मोशी या ठिकाणी आगमन होणार आहे.
चार महिन्याच्या चातुर्मास कालावधी साठी जैन धर्मगुरू चिंचवड गावातील केशवनगर येथील कल्याण प्रतिष्ठाण(सुखी भवन) येथे वास्तव्यास असणार आहेत.शासनाच्या कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून चातुर्मास निमित्त धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होणार असल्याचे संघाचे अध्यक्ष अशोक बागमार माजी अध्यक्ष दिलीप नहार व कल्याण प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सुरेश सेठिया यांनी सांगितले आहे.
जैन धर्मियांमध्ये चातुर्मास कार्यकाळाला विशेष महत्व आहे.यानिमित्त तप, साधना व प्रवचन या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या वर्षीच्या या ऐतिहासिक चातुर्मासाचा लाभ पिंपरी-चिंचवड मधील सर्व जैन बांधवांना मिळाला आहे.या कार्यकाळात जास्तीत जास्त धार्मिक विधी व सामाजिक उपक्रमात शासनाच्या कोरोना विषयक नियमानुसार सहभागी होण्याचे आवाहन संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments are closed