वाकड,दि.५( punetoday9news):- स्त्री ही फक्त मादी नसून एक माणूस म्हणून जोपर्यंत समाज सन्मानाने तिच्याकडे बघत नाही तोपर्यंत महिला सक्षमीकरण म्हणजे मृगजळ आहे असे परखड विचार रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कार्यकारी प्रमुख स्वाती महाळंक यांनी व्यक्त केले.
संकल्प दिनाचे औचित्य साधून क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती तर्फे प्रकाशित होणाऱ्या “अभ्युदय” या स्त्री गौरव विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी महापौर उषा ढोरे, अक्षर कला प्रकाशनचे अध्यक्ष प्रविण वाळिंबे, नंदन देऊळकर, राजीव जोगदेव, डॉ. रंजना नवले, प्रा. शैलजा सांगळे, चंद्रशेखर जोशी, शुभदा मोदी, पद्मश्री गिरीश प्रभुणे उपस्थित होते.
महाळंक पुढे म्हणाल्या अभ्युदय आणि निःश्रेयस हे दोन शब्द जीवनात अत्यंत महत्वाचे आहेत. महापौर उषा ढोरे यांनी अंकाला शुभेच्छा दिल्या. विशेषांकाच्या निर्मितीचा प्रवास कार्यकारी संपादिका स्मिता जोशी यांनी उलगडून दाखविला. प्रवीण वाळिंबे यांनी अंकातील लेख विशेष माहिती देणारा, गुणवत्तापूर्ण असून तो सर्वांनी वाचावा, संग्रही ठेवावा असे आवाहन केले. संचिता काशिदे हिने संकल्प गीत गायले. अंजली सुमंत यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी परिचय करून दिला. वर्षा जाधव यांनी आभार मानले.
Comments are closed