मुंबई, दि.6( punetoday9news):-  विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी आज विधानसभेत 2016-17 मध्ये ते खासदार असताना त्यांचा फोन टॅप करण्यात येत असल्याची माहिती दिली. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

वळसे-पाटील म्हणाले की, फोन टॅपिंग हे प्रकरण गंभीर असून याबाबत सविस्तर उच्चस्तरीय चौकशी करुन याबाबतचा अहवाल पुढच्या अधिवेशनात सादर करण्यात येईल असे नमूद केले.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!