सांगवी,दि.६(punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरातील शिक्षक रामदास पोळ हे बेपत्ता झाले असून कोणाला दिसल्यास सांगवी पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रामदास गणपत पोळ (वय ५२ वर्षे , धंदा- नोकरी , रा . ओ / ४ , लक्षतारा बिल्डींग , मयुर नगरी समोर , काटे पुरम चौक , पिंपळे गुरव , पुणे .) ही व्यक्ती राहत्या घरातून दि . ०६/०२/२०२१ रोजी निघून गेली आहे. जात असताना मुळगाव मु . पो . ओतुर , ता . जुन्नर , जि . पुणे येथे जातो असे सांगुन कोठेतरी निघुन गेले आहेत . ते अदयापपर्यंत राहत्या घरी परत न आल्याने मनुष्य मिसिंग तक्रार नोंदवण्यात आली आहे.
अंगाने मध्यम , उंची ५ फुट ५ इंच , वर्ण गोरा , केस काळे पांढऱ्या रंगाचे , चेहरा गोल , भुवया जाड , नाक सरळ , कान सुपासारखे , डोळे काळे पांढरे , अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळया रंगाची पँट , पायात चप्पल गळयात तुळशीची माळ , जवळ काळया रंगाची छोटीसी बॅग अशा सदर व्यक्तिचे वर्णन असून मराठी , हिंदी , इंग्रजी भाषा चांगल्या प्रकारे बोलतात .
Comments are closed