आठवी ते दहावीचे वर्ग १५ जुलैपासून शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे . मात्र शाळा सुरू करताना गावात किमान एक महिना करोना रुग्ण आढळलेला नसावा , ग्रामपंचायत स्तरावर समिती गठीत करावी , शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करावे , विद्यार्थ्यांनी शाळेत यावे यासाठी ‘ चला मुलांनो शाळेत चला ‘ ही मोहीम राबवण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
मुंबई,दि.८( punetoday9news):- शिक्षण विभागाने पुन्हा बुधवारी नव्याने परिपत्रक काढून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शाळा ह्या एकाच वेळी सुरू होणार नसून त्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवरील कोरोना स्थिती नुसार शाळा सुरू करण्यात येणार आहेत.
नवीन परिपत्रकानुसार ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली तलाठी , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी , ग्रामसेवक , मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख यांची समिती गठीत करावी , शाळा सुरू करण्यापूर्वी गावात किमान एक महिना करोना रुग्ण आढळलेला नसावा , शिक्षकांच्या लसीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे , त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिका-यांनी जिल्हा परिषद आणि शिक्षण अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा , विद्यार्थी करोनाबाधित झाल्यास शाळा तत्काळ बंद करून निर्जंतुकीकरण करावे , विद्यार्थ्यांचे विलगीकरण करून वैद्यकीय उपचार सुरू करावेत , शाळा तात्पुरती बंद करावी लागल्यास शिक्षण सुरू राहण्यासाठी काय उपाययोजना करावी याचा कृतिआराखडा तयार करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Comments are closed