पुणे,दि.९( punetoday9news):- पुणे शहरातील भारती विद्यापीठातील कॅम्पसमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळून आले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी या भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये नोकरीस असून , विद्यापीठाच्या आवारातील क्वॉर्टरमध्येच राहतात . त्या सहा जुलैला सकाळी पावणेनऊच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या . त्यानंतर त्या सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घरी परतल्या . त्यानंतर फ्रेश होण्यासाठी त्या बाथरूममध्ये गेल्या असता , त्यांनी बल्ब लावण्यासाठी ‘ स्वीच ऑन ‘ केला . मात्र , बल्ब लागला नाही . दरम्यान , तो बल्ब काहीसा वेगळा वाटल्याने त्यांना शंका आली . त्यांनी इलेक्ट्रिशियनला बोलावून बल्ब दाखवला असता त्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा असल्याचे आढळले . त्यानंतर फिर्यादीने घरातील अन्य बल्बची पाहणी केली . त्यात बेडरूममध्येही असाच बल्ब लावल्याचे आढळून आले.
मात्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने हे कृत्य कोणी केले ते समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Comments are closed