पुणे,दि.११( punetoday9news):- . मनसेच्या नूतन शहर कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले .त्यावेळी महानगरपालिका निवडणूकांवरही भाष्य केले.

सध्या भाजपा पुणे महापालिकेत सत्तेत आहे . पुणे महापालिका निवडणुकांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत मोठे विधान केल्याने पुण्यात आगामी काळात नवी राजकीय समीकरणे पहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

” निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत . त्यामुळे त्याचे नियोजन नंतरच करण्यात येईल . महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यावेळच्या राजकीय परिस्थितीप्रमाणे कोणासोबत युती करायची याचा निर्णय घेईल . ” असे ते म्हणाले आहेत . कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याने युतीबाबत काही बोलणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . मनसेच्या नूतन शहर कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले .

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!